Sunday , December 7 2025
Breaking News

यंदा ऊसाची कमतरता असल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

Spread the love

 

बोरगांव येथील सभेत शेतकऱ्यांना आवाहन

निपाणी (वार्ता) : जागतिक बाजारपेठेत साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे. उसापासून वीज व गॅस तया होत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर दिला जात नाही.ऊस वाहतूक, ऊस तोडणी कामगार, कारखानदार, पतसंस्था असे सर्व घटक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृती आले पाहिजे. यंदा सर्वत्र ऊस क्षेत्र कमी असतानाही कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस देण्यास गडबड करू नये. दरासाठी यंदा कर्नाटकात आंदोलनाचा धुरळा उडणार आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

बोरगांव येथे शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी स्वामिनानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब पवार होते.
राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांची रिकव्हरी अधिक आहे. पण कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार कमी रिकव्हरी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. साखरमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारखानदार हुशार असून ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर आहे त्या ठिकाणी उडी मरत आहेत. कारखानदार हे लुटारु असून शेतकऱ्यांची फसवणूक करीत मोठे होत आहेत. तरीही सरकार लुटारूंना साथ देत आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मागे का उभे नाही, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. कर्नाटकातील कारखानदार काळाबाजार चोरीने साखर विक्री करीत रिकवरी कमी दाखवीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस उत्पादकांची पिळवणूक होत आहे.काटामारी करत आहेत. कारखाना तोट्यात असल्याचे सांगतात पण गाळप क्षमता वाढवीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. एफआरपीचे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपणही शेतकऱ्यांची एकजूट दाखवली पाहिजेत. अन्यथा एफआरपीचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी १६ ऑक्टोबरच्या २४ व्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर येथे येण्याचे निमंत्रण शेट्टी यांनी यावेळी दिले.
राजू खिचडे यांनी, मुळात शेती परवडणारी नाही. मग आमच्याच ताटातीत तुम्ही का काढून घेता, असा सविल व्यक्त केला. कर्नाटकराज्य रयत संघाचे अध्यक्ष गणेश इळीगार यांनी, कर्नाटकचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. ऊसाला योग्य भाव आणि एफआरपी प्रमाणे दर देऊ असे सांगून खोटी आश्वासन दिली. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी तात्यासाहेब केस्ते, बंटी पाटील, शीतल सोबाने, अभिजीत बिरनाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस शेतकरी नेते सुनील नांगरे-पाटील, दरीखान आज्जा, तात्यासाहेब बसन्नावर, रमेश मालगावे, रावसाहेब आलासे, पुरंदर पाटील, राजाराम देसाई,‌ पंकज तिप्पनावर, विजापूरचे मोतीचंद चव्हाण, तात्यासाहेब केस्ते, रमेश पाटील, अजित रोड्ड, नैनेश पाटील, आदिनाथ जंगटे, अभय पाटील, सुभाष चौगुले, शिशिर सातपुते, अमित माळी, बाबू इचलकरंजे, भरत हवले, पिंटू चौगुले, संदीप चिपरे, अक्षय पवार, अभिनंदन फिरगन्नावर, पोपट पाटील, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी व रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बागेवाडी महाविद्यालयातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love  निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात माध्यमिक आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *