

निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडवरील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) रात्री भीषण आग लागून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर सहकाररत्न उत्तम पाटील घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासह पीडित जाधव कुटुंबीयांशी संवाद साधला. शिवाय बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
दैनंदिन उपजीविकेचा आधार असलेल्या या लहान व्यावसायिक कुटुंबावर आलेल्या संकटात पाटील धीर देत आवश्यक मदतीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विजयराजे निफाडकर सरकार, नगरसेवक शौकत मनेर, विनायक वडे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, ममदापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, सदस्य निरंजन पाटील, इम्रान मकानदार, सुनील शेलार, शिरीष कमते, सचिन पोवार, राजेंद्र कंगळे यांच्यासह नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta