

निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, वरदविनायकनगर कमलनगर येथील नागरी वस्तीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पथदीप व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या उच्चभ्रू परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी चाचपडत ये -जा करावी लागत आहे. तर आवश्यक नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पथदीप बसविले आहेत. नगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
उपनारातील या परिसरात उच्चभ्रू कुटुंबाची वसती आहे. या परिसरात मूलभूत सुविधांचा वाणवा असून मर्क्युरी पथदीप बसविण्याकरता येथील नागरिकांनी वारंवार जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरपालिका प्रशासनासह नाराध्यक्षांना निवेदन दिले आहे. याशिवाय जनस्पंदन कार्यक्रमात तक्रार देऊन सुद्धा या परिसरात एकही पथदीप बसवण्यात आलेला नाही.
सोमनाथ मंदिर ते हालसिद्धनाथ मंदिर पर्यंत निर्माण केलेला फुटपाथ योग्य नसतांना तिथे मात्र पथदिप बसविले आहेत. त्यामुळे हा निधी वाया गेला आहे.
सध्या वरील परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून गल्लीतील दुचाकी आणि चार चाकी वाहने चोरीस गेल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पादचा-याना रस्ताच दिसत नाही. शिवाय परिसरातील रस्ते खराब असल्याने रात्रीच्या वेळी सायकलस्वार व इतर दुचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. तरी या समस्येची गंभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करावी. गरज नसतांना ३७ ठिकाणी पतदीप लाईट बसविण्यात आले आहे. त्याऐवजी नागरी वस्तीला नगरपालिकेने प्राधान्य देऊन त्वरित वरील परिसरात पथदीप बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta