

निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका इंग्लिश माध्यम शाळेतील युकेजीमधील विद्यार्थी तैमुर फैय्याज नगारजी यांने बेंगळुरू येथील कोरमंडलम इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील जी ४ या खेळामध्ये प्रथम क्रमांक आणि कुंफूमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल फटकाविले आहे. त्याला प्रशिक्षक उत्तम सूर्यवंशी, कौस्तुभ जाधव,ऋषिकेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले
तैमुरच्या यशाबद्दल त्याचा हाजी सलीम नगारजी, हणिफ नगारजी, नगरसेवक सद्दाम नगारजी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुबहान नाईकवाडे, सैफ पटेल, टिपु ननदी, नवाज नगारजी, मोसीम नगारजी, अल्ताफ ननदी, मलिक नगारजी, इम्रान नगारजी, अताउल्लानगारजी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta