निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यंदा विक्रमी लाभांशाचे वाटप करण्यात आले. म्हैस दूध उत्पादकांना ४.५% व गाय दूध उत्पादकांना ३.६०% प्रमाणे दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर व मान्यवरांच्या हस्ते सदरचे लाभांश देण्यात आले
संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी, संघाचे संचालक सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ एप्रिल २०२४ ते १ एप्रिल २०२५ अखेर संघामध्ये दूध उत्पादकांनी दूध देऊन संघाच्या प्रगतीसाठी हातभार लावले आहे. वर्षा अखेर २,३६,१७५ लिटर म्हैस दूध तर १,०९,३७० लिटर गाई दुधाचे संकलन करण्यात आले. अरिहंत दूध उत्पादक संघ व कोल्हापूर मधील गोकुळ दूध उत्पादक संघाच्य्या संयुक्त विद्यमानाने पर राज्यातून म्हैस खरेदी केल्यास त्यांना विशेष अनुदान देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या पशु संगोपन कर्नाटका योजनेअंतर्गत सरकारकडून गोठा बांधण्यासाठी ५ लाख ते ५० लाखापर्यंत निधी मंजूर करण्यात येत आहे. त्यामध्ये ३५ टक्के सबसिडी देण्यात येत असून दूध उत्पादकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावर्षी म्हैस दूध उत्पादकांमध्ये प्रकाश चव्हाण, अशोक मोळे व सुरेश छडेदार यांनी अनुक्रमे क्रमांक प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. गाय दूध उत्पादकांमध्ये भरत अमन्नावर, सम्मेद पाटील व सागर सोबाने यांनी यांनी बक्षीसे पटकाविली.
प्रशांत भीवरे यांना ७ हजार रुपये, तैमुर मुजावर यांना ६० हजार रुपये सहाय्यधनाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी संघाचेउपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मायगौडाग पाटील, अजित सवाडे, शितल हावले, रमेश माळी, अनिल बुलबुले, हिराचंद चव्हाण, सुदर्शन पाटील, सीईओ आर.टी. चौगुला, राकेश फिरगणावर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta