Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी दर्गाहमध्ये दिवाळीचा पहिला अभिषेक

Spread the love

 

दिवाळी सणाचा उत्साह : मानकरी, उरूस कमिटीची उपस्थिती

निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या यांच्या दिवाळी सणाला सोमवारी (ता. २०) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थितीतधार्मिक विधींना सुरुवात झाली. दर्गाह मधील तुरबतीस सोमवारी (ता.२०) पहिला मानाचा अभ्यंगस्नान व अभिषेक घालण्यात आला.
श्री. संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब (क. स्व.) यांचा
प्रतिवर्षाप्रमाणे चव्हाण वारसातर्फे मानकऱ्यांबरोबर लवाजम्यासह दीपावली अभिषेक सोहळा (अभ्यंग स्नान) चव्हाणवाडा येथून दर्गा देवस्थान येथे तुरबतीस प्रथम अभ्यंगस्नान व अभिषेक घातला. त्यानंतर श्री. संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळाकडे जाऊन अभिषेक घालण्यात आला. तेथून चव्हाणवाडा (मुळगादी) या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला. यावेळी दर्गा मधील मुजावरांंचा बाळासाहेब देसाई सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास चव्हाण वारस व उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई- सरकार, पृथ्वीराज चव्हाण -सरकार, संग्राम देसाई -सरकार, रणजीत देसाई- सरकार, विवेक मोकाशी, दत्ता रावळ, प्रदीप रावळ, राजेंद्र लाड, प्रकाश मोहिते, सुजित गायकवाड, जयराम मिरजकर, प्रभाकर पाटील, संजय माने, बाळू मोरबाळे, संभाजी मुगळे, जयसिंग कांबळे, बाबासो सुतार, शरद मळगे, पट्टेवाले सदाशिव डवरी, मछिंद्र डवरी अतिश सुतार, सागर हरेल, सचिन पावले, योगेश शहा, शीतल बुडके यांच्यासह साळीसमाज, भाविक आणि मानकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *