

निपाणी (वार्ता) : जत्राट (ता.निपाणी) येथील भाग्यलक्ष्मी फायनान्स कार्पोरेशन तर्फे दिवाळीनिमित्त संस्थेच्या खतेदारांना भेटवस्तुंचे वितरण करण्यात अले. यवेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार उपस्थित होते.
सेक्रेटरी अमित चौगुले यांनी प्रास्ताविक केले.संस्थेचे संस्थापक सचिन कोले यांना श्रध्दांजली वाहिली.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रथमापूजन झाल्यानंतर राजू पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूचे वितरण झाले. राजू पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वनाथ पाटील, जय किसान पीकेपीएस अध्यक्ष बाबासाहेब खोकाटे, सुधाकर थोरात, विजय जबडे, आप्पासा जबडे, विनायक जबडे, दादासाहेब पाटील, रतन फटिंग, आकाश रानमाळे, संतोष पाटील, सागर जबडे, मनोहर हरदारे, मलगोंडा हरदारे, आकाश टिपुकडे, विशाल जबडे, बाळकृष्ण चेंडके, रमेश जासूद, अरिहंत राशिवडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. मथुरा हरदारे यांनी सूत्रसंचालन तर विनायक जबडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta