
Ø
उत्तम पाटील यांची प्रशासनाला सूचना ; उरुसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यासमवेत पाहणी
निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरुसाला शुक्रवारपासून (ता.७ नोव्हेंबर) प्रारंभ होणार आहे. या काळात पवित्रता, शांतता, स्वच्छता, आरोग्यं व मूलभूत सुविधांकडे प्राधान्य द्यावे. भाविकांची गैरसोय होऊ नये अशा सूचना सहकाररत्न उत्तम पाटील यांनी नगरपालिकेसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय पाटील यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांना घेऊन दर्गा परिसराची पाहणी केली.
उरुसानिमित्त ७ ते ९ नोव्हेंबर अखेर गंधलेपन, कुराणखणी, कव्वाली, दंडवत, भर उरूस, विविध शर्यत, धनगरी ओवी,मानाच्य फकिरांचे आगमन, नैवेद्य कार्यक्रम, देवास गलेफ चढविणे, असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उरुस काळात शहरवासीयासह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवण्यासह नगरपालिका, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व हेस्कम विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. दर्गा परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
यावेळी नगरपालिका आयुक्त एस. बी. तोडकर, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, जावेद मकानदार, दिगंबर कांबळे, शोभा हावले, तुळशीदास वसवाडे, बाळू अफराज, अमर शिंगे, फारुख मुजावर, अल्लू मुजावर, अप्पा मुजावर, मजिद मुजावर यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta