

लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास ; व्यवसायिकातून भीतीचे वातावरण
निपाणी(वार्ता) बोरगाव येथे रविवारी (ता.२) रात्री चोरट्यांनी कापड दुकानासह तीन ठिकाणी चोरी करून लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे बोरगावसह परिसरातील व्यापारी वर्गासह नागरिकांतून भेटीचे वातावरण व्यक्त होत आहे. शिवाय पोलिस प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बोरगाव सर्कलवरील इरफान बाबासाहेब काजी यांचे आय ट्रेण्ड या नावाचे कापड दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री ते आपले दुकान बंद करून घरी गेले होते. मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानावरील पत्रा उचकटून दुकानातश प्रवेश केला. दुकानातील लॅपटॉप, किमती कपडे व रोकड असा अंदाजे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला.
सर्कल परिसरात असणाऱ्या मुबारक गवंडी आणि तानाजी मधाळे यांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कमेची चोरी केलीली. सोमवारी (ता.२७) सकाळी साडेनऊच्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताना ही घटना उघडकीस आली. चोरीच्या घटनांची माहिती मिळताच हवालदार कल्लापा बबलेश्वर आणि सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार हे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे बोरगाव परिसरात भीतीसह आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यासह शहरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. सदलगा पोलीस ठाण्यामध्ये या घटनांची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta