
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे : विविध समाजातील प्रमुखांची बैठक
निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. चबुत-यावर पुतळा उभारण्यासाठी धनगर व इतर दानशूर मंडळी कडून रक्कम उपलब्ध करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संगोळी रायण्णा यांच्याबरोबर विविध समाजातील नागरिक लढ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीत सर्व धर्मीयांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामधामात मंगळवारी (ता.२८) आयोजित विविध समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संगोळी रायण्णा यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्याबरोबर इंग्रजांनी विविध समाजातील नागरिकांनाही फाशीची शिक्षा दिली होती. येथील अक्कोळ क्रॉस, अक्कोळ बाळूमामा क्रॉस आणि बोरगाव येथे सर्कलचे सुशोभीकरण होणार सध्या येथील सर्कलच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामास प्रारंभ होणार आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना रायन्ना यांची प्रेरणा मिळावी, यासाठी बेळगाव जिल्ह्यात सर्वात आकर्षक आणि उंच पुतळ्याचे अनावर होणार असल्याचे सांगितले.
सदरचा पुतळाकोल्हापुर येथील प्रभाकर डोंगरसाने हे साकारणार असून त्या कामासाठी पहिला टप्पा म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते दहा लाखाचा धनादेश देण्यात आला. कबुत-याचे काम होताच हा पुतळा सर्कलच्या मध्यभागी बसविण्यात येणार आहे. आर. के. धनगर यांनी स्वागत केले. महादेव कौलापुरे यांनी आभार मानले.
बैठकीस माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले- सडोलकर, नगरसेवक रवींद्र शिंदे,
हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने, सिद्धू नराटे, ग्रामपंचायत अध्यक्ष सत्याप्पा हजारे, कल्लापा डोणे, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेश कदम, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत जासूद, अशोककुमार असोदे, संजय सांगावकर, गोपाळ नाईक, राज पठाण, किरण कोकरे, अब्बास फरास, अल्लाबक्ष बागवान, रियाज बागवान, संदीप चावरेकर, अन्वर बागवान, ॲड. संजय चव्हाण, रामचंद्र निकम, किरण पाटोळे, दीपक सावंत, सचिन हेगडे यांच्यासह विविध समाजातील नागरिक उपस्थित होते.
चिंगळे कुटुंबीय करणार पुतळ्याचा खर्च
सध्या सर्कलच्या सुशोभीकरणासाठी ३.२५ कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केला आहे. तर पुतळ्यासाठी येणारा सर्व खर्च बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिगळे कुटुंबीय करणार असल्याचे निपाणी तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष आर. के. धनगर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta