
निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांची कन्या डॉ.प्रियांका सागर पाटील यांनी नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी प्राप्त केली आहे. शिवाय अपघातातील मृत व्यक्तीच्या नेत्राचे दुसऱ्या व्यक्तीला यशस्वीरीत्या प्रत्यार्पण केले. या अवघड शस्त्रक्रियेमुळे त्यांचा येथील माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले सडोलकर यांच्या हस्ते पाटील दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
किरण कोकरे यांनी प्रास्ताविकात डॉ. प्रियांका पाटील यांचा परिचय करून दिला. बहुजन समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रियांका पाटील व डॉ. सागर पाटील यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी सभापती, अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, बबन घाटगे, दीपक ढणाल,संदीप चावरेकर, माजी नगरसेवक धनाजी निर्मळे, मुन्ना काझी, झाकीर कादरी, प्रथमेश जासुद, माजी नगरसेविका मनीषा जासूद, रियाज बागवान, सुभाष कांबळे यांच्यासह माजी नगरसेवक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta