
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसवाणनगर मधील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला झालेला होता. त्यामध्ये सात जणांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. अशा रुग्णांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यात आले.
नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, माजी नगरसेवक दिलीप पठाडे व मान्यवरांच्या हस्ते रोहित सुनील पारळे, शोभा बाबासाहेब देवडकर, आर्यन संजय यादव, अंजना महादेव बुरुड, रवींद्र महादेव कोरगावकर, जनाबाई श्रीपती मगदूम, बाळकृष्ण सुभाष पाटील, पार्वती विष्णू डवरी, दत्ता मारुती मगदूम, प्रज्वल रामचंद्र काडापुरे या रुग्णांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, आनंदा नलवडे, इऊमरान मकानदार, शिरीष कमते, पप्पू शिंदे, रणजित माने, सुरज राठोड, अवी सांगावकर, ओंकार शिंदे, महेश पाटील, पिंटू चव्हाण, युवराज खडके, महादेव गाडीवड्डर यांच्यासह बसवाणनगर मधील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta