
नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; स्पर्धेला बालचमूसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जंगटे फाउंडेशनतर्फे यंदाच्या दिवाळी निमित्त शरद जंगटे यांनी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोरगाव आणि उपनगरातील बालचमू आणि युवकांनी नानाविध प्रकारचे आकर्षक गड किल्ले साकारले होते. त्यामध्ये निकम गल्लीतील राजे ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार १ रुपये व सन्मा नचिन्ह मिळविले. या स्पर्धा खुल्या गटात असल्याने स्पर्धेत २५ मंडळांनी सहभाग घेतला होता. प्रथमच आयोजित या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिवाळी सणामध्ये करताना सुट्टी असल्याने त्यांनी या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी जिंकलेल्या गड किल्ल्यांची प्रतिकृत्या साकारल्या होत्या.दिवाळीच्या सणात वेळ काढून विद्यार्थी, युवकांनी परिश्रमातून शिवकालीन किल्ल्यांची निर्मिती केली होती. त्यामध्ये रायगड, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग आणि जंजिरा अशा विविध किल्ल्यांचा समावेश होता. स्पर्धेतील विजेत्या दानलिंग गणेश मंडळ व नवरत्न बाल मित्र मंडळ या दोन्ही मंडळांना विभागून द्वितीय क्रमांकाचे ३ हजार १ रुपये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. पार्श्वनाथ चौकातील मिणचे गल्ली युवक मंडळांने तृतीय क्रमांकाचे २ हजार १ रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. गोसावी गल्लीतील केदार गणेश मंडळ मंडळाला चौथ्या क्रमांकाचे १ हजार १ रुपये,सन्मानचिन्ह, देऊन गौरविण्यात आले. उर्वरित सर्व सहभागी संघांना शरद जंगटे फाउंडेशन तर्फे उत्तेजनार्थ बक्षीसे, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जनटे व मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास बी. के. महाजन, जितू पाटील, बबन रेंदाळे, महिपती खोत, शेशु ऐदमळे महादेव ऐदमाळे, इलाई कापसे, प्रकाश निकम, संजय महाजन, शंकर गुरव, किसन गोसावी, दीपक वाघमोडे यांच्यसह, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta