
निपाणी : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मूक फेरीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले, यामुळे तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली होती. तरीही संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील (ता. निपाणी) कोगनोळी टोल नाक्यावर पोहचले. येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करून अडवण्यात आल्यामुळे बेळगाव सीमेवर तणाव होता. तरीही बंदी जुगारून शिवसेनेचे नेते कर्नाटक जाण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व गोंधळात पोलिसांनी शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांना ताब्यात घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta