
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आमाते गल्लीतील टपाल कार्यालया जवळील विघ्नहर्ता तरूणमं डळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी १० वर्ष वेगवेगळे गडकोट किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या जातात. शिवाय दिवाळीनंतर ते नागरिकांसाठी खुले करून किल्ल्यांची माहिती सांगितली जाते. यंदा तोरणा किल्ल्याची निर्मिती केली असून त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.३) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
दरवर्षी मंडळातर्फे गडकोट मोहीम राबवून गडकोट परीसर स्वच्छ करण्यामध्ये पुढाकार घेतला जातो. छत्रपती शिवराजांनी स्वराज्याचा पहीला किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. त्याच किल्ल्याची उभेहूब प्रतिकृती यंदा साकारण्यात आली आहे. ही प्रतिकृती सोमवारी (ता.३) सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितित पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कारांंनी सन्मानीत झालेले मुलुख मैदानी तोफ शिवव्याख्याते प्रथमेश पाटील हे गडकोटांची माहीती देणार आहेत. तरी शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील शिवप्रेमी नागरीक, युवती, महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनिल चन्नण्णावर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta