
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली येथील शाखेचा ९ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शाखेचे उपाध्यक्ष वसंत बुद्धाळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन तर शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यशवंत पोवार यांनी, कुर्ली शाखेत ७ कोटी ठेवी असून ६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. शाखेला ३१ मार्चअखेर १६ लाखाचा नफा झाला आहे. ४० कोटी रूपयावर वार्षिक उलाढाल झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी, मुख्य शाखेचे अध्यक्ष श्रीकांत परमणे, उपाध्यक्ष प्रताप पट्टणशेट्टी, सीईओ एस. के, अदणावर शाखा संचालक अमोल माळी, कृष्णा मगदूम, रामचंद्र हेरवाडे, कुमार माळी, किरण निकाडे, हरी निकाडे, बाळासो वैराट, सुधाकर व्हराटे, प्रदीप बुद्धाळे, विनायक तेली, बाबुराव पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह शाखेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. दिलीप गायकवाड यांनी सूत्रसंचान तर शाखा व्यवस्थापक संजय जाधव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta