सौंदलगा : सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नातून कर्नाटक शासनाच्या कामगार कल्याण मंडळ बंगळूर या विभागाकडून मिळालेल्या 50 बुस्टर किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येथील लाल बावटा बांधकाम कामगारांना बुस्टर किटचे वितरण निपाणी तालुका लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष नेताजी कोळी, सेक्रेटरी धनाजी कांबळे, डॉ. राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव धनाजी कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले की, अनेक क्षेत्रातील कामगार हा आज काम केले तरच त्यांचे पोट भरते. अशी या कामगारांची परिस्थिती झाली आहे. म्हणून कर्नाटक शासनाने आमच्या कामगारांच्यासाठी व त्यांच्या मुलांच्यासाठी निपाणी तालुक्यांमध्ये मोफत आरोग्य केंद्र, मोफत महाविद्यालयीन शिक्षण तसेच कर्नाटकातील काही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत असलेल्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी, अशी येथील कामगार संघटनेची मागणी होत आहे.
यावेळी वैभव मेस्त्री, शशिकांत मेस्त्री, शिवाजी मेस्त्री, प्रकाश वडर, प्रकाश सुतार, मारुती लोहार, किसन लोहार, हरी सुतार, चेतन कासार, ईश्वर कुंभार, जोतीराम साळुंखे, दत्ता पाटील, युवराज कांबळे, सागर सुतार तसेच संघटनेचे सदस्य, कामगार उपस्थित होते.
शेवटी संजय आरेकर यांनी आभार मानले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …