
निपाणी ऑल इंडिया दलित पँथरची बैठक
निपाणी (वार्ता) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार धोक्यात आले आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पँथर सेना ही केवळ दिखाऊणा नसून तो एक विचार असल्याचे मत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते..
आरेश सनदी यांनी स्वागत तर बेळगाव जिल्हा पँथर सेनेचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपक केदार म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया पँथर सेनेने मूलभूत प्रश्नवर लढा उभा करणे गरजेचे आहे. देशाच्या खऱ्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला. प्रा. डॉ. अच्युत माने, कोल्हापूर जिल्हा पँथर अध्यक्ष चरणदास कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास पँथर सेनेचे बाळासाहेब शेडगे, जितेंद्र जगताप, पँथर सेना तालुका अध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे, राहुल लाटकर, प्रवीण वंटे, पिंटू माने, यासीन मनेर, बबन भोसले, रवी कांबळे, लोकेश यांच्यासह पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta