
नगरसेवकांचा आक्षेप ; नागरिकांच्याही संतप्त प्रतिक्रिया
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत ३१ ऑक्टोबर संपुष्टात आली. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आयुक्तांनी शहराचा कारभार हाती घेतला. तरीही सभागृह म्हणून पदाधिकारी व नगरसेवक कार्यरत आहेत. असे असताना सभागृह संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालयात असलेले नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक काढण्यात आले होते. केवळ दोनच दिवसात पुन्हा नावाचे फलक लावून नगरपालिका आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली. पण आता लावलेल्या फलकामध्ये असंख्य चुका आढळल्याने नगरपालिकेतील पदाधिकांनी आक्षेप घेतला असून संबंधित प्रभागातील नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपताच नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सांगून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष सभापतीसह नगरसेवक आणि शासन नियुक्त नगरसेवकांची नावे पदाधिकाऱ्यांची नावे फलकावरून हटवली. सभागृह कालावधी संपुष्टात आला असला तरी सदरचे सभागृह पुढे चालू ठेवणे अथवा नाही याबाबत न्यायालयाची सुनवणी झालेली नव्हती. तरीही सभागृहात निवडून आलेले ३१ आणि शासन नियुक्त पांच असे ३६ नगरसेवक कार्यरत होते. आता खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले हे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे फलक काढलेले नव्हते. आता त्यांच्याबरोबरच ३६ नगरसेवकांच्या नावाचे फलक पुन्हा लागले आहेत. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
——————————————————————-
फलकावर अनेक गंभीर चुका
येथील नगरपालिकेत अनिता दिलीप पठाडे या नगरसेविका आहेत. त्यांच्या नावाच्या ठिकाणी अनिता रवींद्र इंगवले असे नाव लावले आहे. याशिवाय पूर्वी इंग्रजी मध्ये असलेली नावे सध्या कन्नडमध्ये लावण्यात आले आहेत. यावरूनच मराठी द्वेष सुरू असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta