
अब्दुल लाटची बैलगाडी द्वितीय ; शर्यती शौकिनांची गर्दी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या ऊरूसा निमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीसाठी बोरगावच्या ऋषिकेश मनगुते, अब्दुल लाटच्या सचिन खोत आणि शिरढोणच्या अशिफ मुल्ला यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना युवराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे २१ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांची बक्षिसे आणि निशाण देण्यात आले.
जनरल घोडा -गाडी खरेदीमध्ये फिरोज चाऊस -चांद शिरदवाड, अमोल निकम- बोरगाव आणि राजू मगदूम -बोरगाव यांच्या गाड्यानी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून ७ हजार रुपये, ५ हजार रुपये आणि ३ हजार रुपयांची बक्षिसे पटकाविली. नवतर जनरल घोडा -गाडी शर्यतीमध्ये बोरगाव येथील मल्हार प्रेमी ग्रुपने प्रथम क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. काही तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांचा गोंधळ उडालेले उर्वरित दोन क्रमांक आणि जनरल घोडा- बैलगाडी शर्यती रद्द करण्यात आल्या.
युवराज पाटील यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. तर विजेच्या स्पर्धकांना नगराध्यक्ष पिंटू कांबळे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, अमोल निकम, बाळासाहेब वसवाडे, पिंटू माळी, रमेश माळी, अमर शिंगे, तुळशीदास वसवाडे, फैयाज अपराज, फारुख मुजावर, चांद अपराज, तुफान अफराज, बबन निकम यांचा सह हिंदू मुस्लिम ऊरूस कमिटी पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यावेळी बोरगावसह परिसरातील शर्यती शौकिन उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta