
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; शर्यतीसह कुस्तीची मेजवानी
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील ग्रामदैवत श्रीकाडसिद्धेश्वर यात्रेला सोमवार( ता. १७) पासून प्रारंभ होणार आहे. बुधवार (ता. १९) अखेर चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय शर्यती आणि कुस्तीची मेजवानी ही मिळणार आहे.
सोमवारी (ता. १७) सिद्धेश्वर देवास रुद्राभिषेक, नैवेद्य दुपारी महाप्रसाद, रात्री सिद्धेश्वर पालखी मिरवणूक आणि यात्रा कमिटी कडून आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. याशिवाय फ्रेश गॅंगतर्फे पालखी मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी घालून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. १६) रात्री आठ वाजता सिद्धेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. १७) विद्युत रोषणाई स्पर्धा असून विजेत्यांना अनुक्रमे दहा १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपयांचे बक्षीसे देण्यात येणार आहेत. दुपारी २ वाजता सिद्धेश्वर देवालयात आयोजित चित्रकला देखील विजेत्यांना अनुक्रमे १००१, ७०१, ५०१ आणि उत्तेजनार्थ २०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. रात्री पालखी मिरवणूकमध्ये बेडकिहाळमधील सिद्धेश्वर बँड कंपनी किल्ले मच्छिंद्रगड येथील नॅशनल बँड कंपनी यांच्यात वाद्यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. १७, १८ व १९ नोव्हेंबर रोजी आयोजित रिल्स मेकिंग स्पर्धेतील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार २ हजार रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत.
मंगळवारी (ता. १८) सकाळी ९ वाजता सिद्धेश्वर खुल्या मॅरेथॉन स्पर्धा, ओपन पुरुष गटासाठी पाच किलोमीटर, ओपन महिला गटासाठी तीन किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. रात्री ८ वाजता होणाऱ्या संगीत खुर्ची स्पर्धेसाठी १००१, ७०१, ५०१ रुपये बक्षीसे आहेत. रात्री देवर कल्लोळ येथील बँडवाद्यांच्या गजरात लक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक निघणार आहेत. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta