
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूह बोरगांवचे कार्याध्यक्ष, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा ५० वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अरिहंत सहकारी जवळी गिरणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला बोरगाव सह परिसरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नगरसेवक अभय कुमार मगदूम यांनी, अत्यंत कमी वयात अभिनंदन पाटील यांनी दिवंगत सकारात्मक रावसाहेब पाटील, बंधू सहकारत्न उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव परिसराचा कायापट केला आहे. उद्योग व्यवसाय निर्माण करून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी बोरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, तुळशीदास वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक दिगंबर कांबळे, शोभा हवले, अरिहंत बँकेचे संचालक सुभाष शेट्टी, राजू मगदूम, अभय करोले, पिरगोंडा पाटील, आण्णासाहेब भोजकर, अशोक नेजे, सूतगिरणीचे कार्यकारी संचालक युवराज ज्योती, सीईओ राजेश कार्वेकर, संदीप कुलकर्णी, प्रकाश बापू यांच्यासह सांगली ब्लड बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून येथीलप्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, शोभा हवले, बी. टी. वठारे, अरिहंत बँकेचे संचालक सुभाष शेट्टी, राजू मगदूम, अभयकुमार करोले, जम्बू बल्लोळे, शिवानंद राजमाने, पिरगोंडा पाटील, आण्णासाहेब भोजकर, राजू ऐदमाळे, आण्णाप्पा डांगे, माजी नगरसेवक संगाप्पा ऐदमाळे, अमर शिंगे, अशोक नेजे, ए. टी. वठारे, संजू ऐदमाळे, पायगोंडा पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, उत्तम आण्णा प्रेमी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta