
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची शिफारस : समर्थक, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीची ( केपीसीसी) रचना केली जात आहे. काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या कमिटीत निवड केली जाते. त्यानुसार निपाणी भागामधून ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांची केपीसीसी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शिफारसीनुसार प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी का बाबतचे पत्र सोमवारी (ता.१७) बेळगाव येथे दिले आहे.
माजी आमदार दिवंगत रघुनाथराव कदम यांनी खऱ्या अर्थाने निपाणी भागात काँग्रेस विचारधारा रुजवली. पक्ष मजबूत करण्यासह अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले. त्यांचे चिरंजीव राजेश कदम यांनी २५ वर्षे पक्षाचे काम केले.त्याची दखल घेऊन राजेश कदम यांची केपीसीसी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. राजेश कदम म्हणाले, वडील दिवंगत माजी आमदार रघुनाथराव कदम, त्यांच्यानंतर माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह नेत्यांच्या सहकार्याने पक्ष मजबुतीसाठी यापुढेही काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, महादेव कौलापुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta