
राजू खिचडे ; बोरगावमध्ये अभिनंदन, उत्तम पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘अरिहंत’च्या माध्यमातून अभिनंदन आणि उत्तम पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवून त्यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिला आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात जैनापुर मधील अरिहंत शुगर इंडस्ट्रीजतर्फे पाटील बंधूंनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही बायो प्रोडक्ट नसताना ऊसाला ३३५० रुपये प्रति टन दर देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित जोपासले असल्याचे मत शेतकरी संघटनेचे राजू खिचडे यांनी व्यक्त केले.
अरिहंत साखर कारखान्याकडून प्रति टन ऊसाला ३३५० रुपये असा उच्चांकी दर दिल्याने बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१७) युवा उद्योजक अभिनंदन पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राजू खिचडे बोलत होते.
कर्नाटक रयत संघाचे गौरव अध्यक्ष दरीखान आज्जा यांनी सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील हे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांचा विकास झाला आहे. सहकार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी पत देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविले असल्याचे सांगितले. यावेळी तात्यासाहेब बसन्नावर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत केले. उत्तम पाटील, अभिनंदन पाटील यांनी, सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्या फुलकाळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी आर्यांचे संस्था खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास पंकज तिप्पण्णावर, रमेश पाटील, तात्यासो केस्ते, तात्यासाहेब पाटील, शीतल बागे, बाबासो पाटील, सुभाष चौगुले, अभिनंदन फिरंगण्णावर, रमेश मालगावे, बंटी पाटील, अभय पाटील, विकास समगे, राहुल घाटगे, प्रकाश तारदाळे, पोपट पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta