
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून ५ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून सुसज्ज कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्याच्या समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनासह नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना बहुजन समाजातर्फे देण्यात आले.
विजयकुमार शिंगे यांनी, बोरगाव हे मोठे शहर असून येथे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. संविधान लिहिलेल्या डॉ. आंबेडकर पूर्णकृती पुतळा नगरपालिका नवीन इमारती समोर निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून बहुजन समाजाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अजित कांबळे, मंगल माळकरी यांनी मनोगत व्यक्त केले. पंडित हिरेमनी, तुषार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांनी निवेदन स्वीकारून नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा करून याबाबत ठराव घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, नगरसेविका संगीता शिंगे, अमर शिंगे, शिवाजी भोरे, राजू, शिंगे, किरण शिंगे, बबलू मधाळे, अश्विन मानवी, सर्जेराव धनवडे, पिंटू मधाळे, बुद्धम कुरळे, आकाश वडर, लक्ष्मण दुर्गमर्गे, अनिल कोरवी, सुकुमार हिरेमनी, सुरज वडर, दिनेश कांबळे यांच्यासह बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta