Wednesday , March 4 2026
Breaking News

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांनी दैनंदिन शालेय शिक्षणासह क्रीडाक्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान विभागात चांगले कार्य करीत आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, तालुका आणि राष्ट्रीय स्पर्धेत विविध उपकरणांची निर्मिती करत आहेत. त्याची शालेय शिक्षण क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या विज्ञान साहित्याची विद्यार्थ्यांनी निर्मिती करून त्याचा सर्वांसाठी उपयोग व्हावा. यासाठी आर. ए. पाटील पब्लिक स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या पुढील काळातील या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निरंतरपणे सरकार राहील, असे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील आर. ए. पाटील पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान व कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

उत्तम पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, स्पर्धात्मक युगाचे ज्ञान मिळावे व येथील विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचावेत, यासाठी दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली. त्यामध्ये सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिक कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने विज्ञान वस्तू प्रदर्शन भरवल्याचे स्पष्ट केले. निडसोशी येथील दूरदुंडेश्वर शिक्षण संस्थेचे सीईओ बी. ए. पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संचालिका मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, रीना अंगडी, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, संचालक महादेव उलपे, अण्णासाहेब भोजकर, आर. टी. चौगुला, प्राचार्या रूपाली देसाई, समन्वयिका शमिका शहा, सीईओ बाळासाहेब हवले, संदीप मगदूम यांच्यासह संचालक, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *