दौलतराव पाटील फाउंडेशनची मागणी: नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगातही औषधोपचार सोबत तंत्र मंत्र उतारा यांचाही आधार घेतला जातो. याचा प्रत्येय
निपाणी येथील कोल्हापूरवेस मार्गावरील दौलतराव पाटील उड्डाण पुला जवळ आला. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या उताऱ्यासह गंडेदोरे पडत होते. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून महिला आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. उतारे टाकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनने स्वच्छतेची मागणी केली होती. त्याची नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बातमीचा इफेक्ट होऊन उड्डाणपुल परिसरातील उतारे व गंडेदोरे यांची स्वच्छता केली आहे.
उड्डाणपूल परिसरात सुया, टाचण्या, टोचलेले लिंबू, नारळ, बाहुल्या, भोपळे, अन्नपदार्थ अशा अनेक वस्तू उतारा काढून या ठिकाणी टाकले जात होते. याबाबत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबतर्फे पुढाकार घेऊन स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता. शिवाय या ठिकाणी अघोरी प्रकार करणार्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दोन दिवसात या ठिकाणची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने न केल्यास दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व जायंटस क्लबतर्फे स्वच्छतेची मोहीम हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले होते
तत्पूर्वीच नगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन स्वच्छता केल्याने परिसरातील विद्यार्थी महिला व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. यापुढील काळात असे अघोरी प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर नगरपालिका प्रशासनाने पथदीपांची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
यावेळी सुरेश घाटगे, रमेश भोईटे, निकु पाटील, वसंत धारव, महादेव बन्ने, आकाश मल्लाडे, रणजीत मगदूम, विक्रांत पावले, बबन निर्मले, छोटू पावले, महेश बाचणे, सागर पाटील यांच्यासह जायंटस ग्रुप व फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
—-
Belgaum Varta Belgaum Varta