

बंद घराला केले लक्ष: चांदीच्या दागिन्यासह २५ हजार लंपास
निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट केली. बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यासह रोख २५ हजार रुपये कंपास केले आहेत. या घटनेमुळे उपनारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजू कृष्णा घाटगे असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे.

राजू घाटगे यांचे मूळ गाव कणगला असून ते सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर १४ वर्षांपूर्वी येथील अष्टविनायक नगरामध्ये बंगला बांधला आहे. त्यामध्ये पती-पत्नी व दोन मुले राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते. कार्यक्रमासाठी ते घराला कुलूप लावून कुटुंबासमवेत इस्लामपूर येथे गेले होते.
बुधवारी (ता.२६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक नगर येथे परतल्यानंतर चोरीची घटना लक्षात आली. चोरट्याने बाहेरील गेटवरून चढून घराच्या दारापर्यंत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील बाजूस असलेल्या बेडरूम मध्ये असलेली तिजोरी व इतर साहित्य विस्कटून ही चोरी केली.
या चोरीमध्ये आठ तोळ्याचा लक्ष्मी हार, पाच तोळ्याचे दोन चेन, साडेतीन तोळ्याच्या हातातील कडे, एक तोळ्याचा तीन अंगठ्या, अर्धा तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्यांचे झुमके, अर्धा किलोचे चांदीचे दागिने आणि रोख २५ हजाराचा समावेश आहे.
दरम्यान सायंकाळी उशिरा बेळगाव येथून श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी घरासमोरील खणीच्या परिसरात महामार्गाकडे चोरटे गेल्याचे दाखविले. दुपारनंतर उपनिरीक्षक रमेश पवार आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती संकलित केली आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंदविण्याचे काम सुरू होते.
——————————————————————–अंधाराचा फायदा घेऊन चोरी
अष्टविनायक नगर परिसरात मोठी खन आहे. परिसरात अनेक कुटुंबे वास्तव्यवसायक. पण बऱ्याच महिन्यापासून या परिसरातील पथदीप बंद आहेत. याबाबत नगरपालिकेला कळवूनही पथदिप लावण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन ही चोरी केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta