
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मंगळवारी (२ डिसेंबर)
‘अद्वितीयम’ राज्यस्तरीय सर्जनशील स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी दिली.
प्राचार्य हुरळी म्हणाले, कार्यक्रमासाठी १ लाख ३२ हजार रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत. सहभागींसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. महाविद्यालयीन विभाग आणि हायस्कूल विभागांसाठी स्वतंत्र बक्षिससे देण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता.२) प्रज्ञान-४ (विज्ञान प्रदर्शन), लोकनृत्यंजली (लोकनृत्य स्पर्धा),
प्रतिभा संग्राम (प्रश्नमंजुषा) कार्यक्रम होणार आहे.प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांसाठी अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत स्वतंत्रपणे दिलेला लिंक कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा किंवा एसएमएस पाठवून नोंदणी करावी. कार्यक्रमाच्या दिवशी देखील नोंदणी उपलब्ध असेल असे आयोजकांनी सांगितले. यावेळी पदवीपूर्वकॉलेजच्या प्राचार्य हेमा चिक्कमठ, कार्यक्रम समन्वय सचिव डॉ. ए. ए. कांबळे, समन्वयक अश्विनी किल्लेदार, सह-संयोजक बी. एच. नायक, महेश केंचगौडा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta