Sunday , July 26 2026
Breaking News

….अन लेकरांसाठी धावला कानडा विठ्ठल!

Spread the love

 

बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती अशी होती हे पाहून. कारण त्याच्या घरी अंथरून धरून पडून असलेले दोन अपंग चिरंजीव, त्यांचा सांभाळ करणारी त्यांची पत्नी आणि त्या मातेला सुध्दा होत असणारा श्वसनाचा त्रास, रहायला छोटसे मोडक तोडक घर, अशी बिकट परिस्थिती पाहून मन सुन्न करणारा त्यांच्या एक विडिओ बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, फर्निचर व्यावसायिक, बेळगाव येथील नामवंत “वन टच फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांच्याकडे आला. त्यांनी त्वरीत तिकडे त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. अणि त्यांना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक आहारधान्य साहित्य, तसेच त्या मातेला रोख रक्कम देऊन त्यांचे सांत्वन केले. कर्नाटक बेळगावमधून एक कलाकार महाराष्ट्र येथील एका कलाकाराला मदत केलेली पाहून “त्या” माऊलीचे डोळे पाणावले. त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत त्याच गावातील, सरपंच, माजी सरपंच श्री. शिवाजी कांबळे यांनी खरोखर या माऊलीसाठी, या लेकरांसाठी “धावला हा कानडा विठ्ठल” असे संबोधून त्यांचे आभार मानले, त्यांच्या सोबत नागनवाडी येथील डॉ. शुभम बांदिवडेकर, सचिन बांदिवडेकर, रोहन गावडे, सौ.कल्पना सावगावकर, ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *