
बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान कारणीभूत ठरले आहे. आरोग्याच्या व्याधी विज्ञानाच्या प्रगतीमुळेच कमी करणे शक्य झाले आहे. कोरोना काळातही विज्ञानाने केलेल्या कामगिरीमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. शिवाय रस्ते, वाहतूक, कमी वेळेत प्रवास शक्य झाला आहे. तसेच विज्ञानामुळे कृषी क्षेत्रातही क्रांती झाली आहे. एकंदरीत विज्ञानामुळे देशात वैविध्यपूर्ण प्रगती झाली आहे, असे मत आमदार महांतेश कवठगीमठ यांनी व्यक्त केले.
केएलई संस्थेच्या येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयात आयोजित ‘अद्वितीयम’विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक प्रवीण उर्फ अमर बागेवाडी उपस्थित होते.
पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्या हेमाचिकमट यांनी स्वागत तर प्राचार्य एम.एम. हुरळी यांनी प्रास्ताविक केले.
आमदार कवठगीमठ म्हणाले, विज्ञानामुळे नवजीवन मिळणे शक्य झाले आहे. भारत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सक्षम बनला आहे. ई- लायब्ररी ची संकल्पना मूर्त स्वरूपात आली असून भू-विज्ञानातही नवीन संशोधन करण्यात येत आहे. प्लास्टिक पासून मुक्ती मिळविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे. विज्ञानामुळे अणुऊर्जा, अणुबॉम्बचेही निर्मिती. मोबाईल क्रांतिचा सदुपयोग होणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्पर्धेत १८२ संघ सहभागी झाले असून विजेत्यांना १ लाखांची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, महेश बागेवाडी, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. ए. ए. कांबळे, ॲड. संजय शिंत्रे, प्रा. एम. बी. कोथळी, प्रा. एस. बी. सोलबन्नावर, प्रा. डॉ. श्रीपती रायमाने, बी.आर. कांबळे, प्रा. जनगौडा, डॉ. आर. जे. खराबे, सागर मिरजे, प्रा. डॉ. एम. बी. कोथळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. गीता कमते, नमिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक ए.ए. कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta