

ॲड.असीम सरोदे, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. कपिल राजहंस यांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गेल्या २८ वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून निरंतरपणे बहुजन समाजातील तरुणांच्यात सामाजिक समतेच्या विचारांची बीजे रोवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. खऱ्या अर्थाने समाज गुण्या गोविंदाने राहुन जात, पंत, धर्म, भाषा भेद या पलीकडे जाऊन समाजाची सर्वसमावेशक जडणघडण व्हावी, या उद्देशाने संमेलनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. यंदा २१ डिसेंबरला होणाऱ्या विचार संमेलनात ॲड. असीम सरोदे, डॉ. स्वप्नील चौधरी डॉ. कपिल राजहंस यांचा सहभाग आहे. या संमेलनास शहर आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आंबेडकर विचार मंचचे संस्थापक प्रा. सुरेश कांबळे यांनी केले आहे.
प्रा. कांबळे म्हणाले, समाजातील शोषित वंचित बहुजन शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या मनामध्ये विचारांची ज्योत पेटून त्यांना स्वाभिमानी जीवन जगता यावे यासाठीच शिवराय ते भिमराय ही विचारधारा स्वीकारली आहे. फुले, शाहू आंबेडकर विचार संमेलनाला आम्ही सुरुवात केली आहे. संमेलनास महाराष्ट्रातील दिग्गज विचारवंत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. असीम सरोदे,
महाराष्ट्रामध्ये दंगल समजून घेऊ या कवितेने आत्मभान प्राप्त झालेले कवी डॉ. स्वप्निल चौधरी, इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. कपिल राजहंस यांच्या विचारांचा जागर होणार आहे. याशिवाय संमेलनात विविध वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी निपाणी व परिसरातील समतावादी, परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी मराठा मंडळ येथे आयोजित संमेलनास सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta