
निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात माध्यमिक आणि महाविद्यालयीन पातळीवरील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, प्रज्ञाशोध स्पर्धापार पडल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील विजेत्यांना एकूण १ लाख ३२ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
महाविद्यालयीन पातळीवरील विज्ञान प्रदर्शनामध्ये लक्ष्मी उमराणी, कीर्ती मालकोजी-संगोळ्ळी रायण्णा कॉलेज- बेळगाव, श्रुती रावळ, रेखा निपनाळ-केएलई कॉलेज -महालिंगपूर, अभिषेक हादी, गणेश एस.-डी.एस. नाडगे कॉलेज- कारदगा आणि विवेक इंगळे, अशोक महाविनकट्टी-जीआय बागेवाडी कॉलेज -निपाणी यांनी अनुक्रमे प्रथम ते चौथ्या क्रमांकाची बक्षिसे पटवली
हायस्कूल विभागातील प्रज्ञाशोध स्पर्धेत कौटिल्य टीम-गोकाक, रुद्रा टीम-राणेबेन्नूर आणि आराध्या टीम -कोननकेरी यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळवली.
माध्यमिक पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात ओम मेहता-एल ई सी बी एस ई स्कूल निपाणी, अथर्व पाटील, ओंकार शेवाळे-न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा, निसार मुजावर, अय्याज चाऊस-बोरगाव हायस्कूल आणि चेतन खोत, इराण्णा देसन्नावर-मोरारजी देसाई हायस्कूल गव्हाण यांनी प्रथम चतुर्थ क्रमांकाची बक्षिसे पटकाविली. अद्वितीयम विज्ञान प्रदर्शनात शालेय आणि महाविद्यालयीन विभागातील १८२ संघांनी भाग घेतला होता. लोकनृत्य स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विभागातील ४९ संघांनी सहभाग घेतला. प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विभागातील ३४ संघांनी भाग घेतला. परीक्षेत म्हणून नऊ शिक्षकांनी काम पाहिले. एक विभागातील विजेत्यांना अनुक्रमे१० हजार, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्य हेमा चिक्कमठ, कार्यक्रम समन्वय सचिव डॉ. ए. ए. कांबळे, प्रा. डॉ. श्रीपती रायमाने, समन्वयक अश्विनी किल्लेदार, सह-संयोजक बी. एच. नायक, महेश केंचगौडा यांच्यासह प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta