
निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक वर्षापासून नदीच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. याबाबत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी नदी पासून पाणी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या कामाचा पूर्तता केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते या पाणी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, बोरगाव नगरपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून बोरगाव शहरापासून ते आयकोपर्यंतच्या नदीच्या पाईपलाईन साठी ४० लाखांचा अनुदान मंजूर झाले होते. तसेच नळ जोडणीसाठी ५ लाख अनुदान मिळाले. त्यातून पाणी योजना पूर्ण केली आहे. बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकु मगदूम, शोभा हावले, माणिक कुंभार, तुळसीदास वसवाडे, दिगंबर कांबळे, अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, गिरिजा वठारे, सुवर्णा सोबाने, संगीता शिंगे, जावेद मकानदार, रुक्साना अफराज, माजी नगराध्यक्ष संगापा ऐदमाळे, राजू मगदूम, अशोक वठारे, बाबासो वठारे, अमर उमराणे, किसन पाटील, अक्षय यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta