
धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात
निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळील अर्जुननगर (ता. कागल) येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस निर्जन्य स्थळी युवकाचा खुन करून त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. नंतर खुना सदरचा मृतदेह येथील निकम ओढ्यामध्ये फेकून दिल्याची घटना शनिवारी (ता.६) पहाटे उघडकीस आली आहे. सुहास थोरात (वय २१ रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जवाहर तलाव आहे. त्याला लागूनच निर्मनुष्य परिसर असून या ठिकाणी नेहमी मद्यपींची वर्दळ असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथून सुहास थोरात व त्यांचे मित्र शुक्रवारी (ता.५) दुपारी निपाणी येथे चार चाकी वाहन पाहण्याच्या दृष्टीने आले असावेत. त्यानंतर त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या निकम ओढ्याच्या परिसरात मद्य प्राशन केले होते. त्यानंतर थोरात आणि मित्रांमध्ये किरकोळ वाढ झाल्याने धारदार हत्यारांनी थोरात यांच्या डोक्यासह मानेवर वार करण्यात आले. त्यानंतर रक्ताच्या थारोळात पडलेल्या सुहास गतप्राण झाल्यानंतर शेजारीच असलेल्या ओढ्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला.
अर्जुनी (ता. कागल) येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी अर्जुननगर हद्दीत शिप्पुरकर व निकम बंधू यांच्या शेताच्यामधून जाणाऱ्या ओढ्यात तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मुरगुड पोलिसात दिली. त्यानुसारघटनास्थळी मुरगुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष करे, हवालदार बजरंग पाटील, अमर कुंभार, संतोष भांदिगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला.यावेळी सुहास याच्या डोक्यावर धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले.
खून झालेल्या युवकाची उंची ५ फूट असून अंगावर जांभळ्या रंगाचा टी-शर्ट तर निळ्या रंगाची पॅन्ट आहे. उजव्या हातात चांदीचे कडे आहे.युवकाचा खुन नेमक्या कोणत्या कारणातून खून झाल्याचे समजू शकले नाही. मुरगूड पोलिसांसह इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास चालविला आहे. अर्जुननगर परिसरात खून झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
—————————————————————-
फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी घटनास्थळी
निपाणी परिसरात झालेल्या खुनाच्या अधिक माहितीसाठी कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅब चे अधिकारी व वैद्यकीय पथक दाखल झाले होते. त्यांनी रक्ताचे नमुने व इतर माहिती संकलित केली आहे. त्यानुसार मारेकऱ्यांना तात्काळ शोधणे शक्य होणार आहे.
————————————————————–
निर्जन्य परिसराचा फायदा
अर्जुननगर येथे घडलेल्या घटनेचा परिसर नेहमी निर्जन्य असतो. या परिसरात सायंकाळ होताच अवैध धंदे व गर्दुल्यांची गर्दी असते. शिवाय जेवणाच्या पार्ट्याही रंगतात. त्यामुळे या स्थळाचा फायदा उठवत मारेकऱ्यांनी आपला डाव साधल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
Belgaum Varta Belgaum Varta