Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love

 

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर

निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात गेल्या आठवड्यापासून शास्त्रधारी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांचा धुमाकूळ वाढतच चालला असून कुलुप बंद असलेल्या घरांना लक्ष्य करून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह लाखो रुपयावर डल्ला मारला आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निपाणी पोलिसासमोर असतानाच शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हातात लोखंडी साहित्य घेऊन येथील माने प्लॉटमध्ये दरोड्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आल्याने त्यांच्यासमोरूनच चोरट्यांनी चोरी न करता धूम ठोकली आहे. या घटनामुळे शहरास उपनगरात दहशत निर्माण झाले आहे.
आठवड्याभरात निपाणी उपनगरातील अष्टविनायक नगर, पंतनगर, शिवाजीनगर, बिरोबा माळ येथील बंद घरासह चिक्कोडी रोडवरील भांड्याच्या दुकानातही चोरट्यानी हात साफ केला आहे. त्यामध्ये लाखो रुपयांचे दागिने व रक्कम घेऊन पोवारा केला आहे. परंतु वरील घटनातील एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे केले आहे.
परंतु चोर पोलीसांच्या हाती लागलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मंडल निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर, बसवेश्वर चौक आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांनी सहकाऱ्यांना घेऊन शहरासह उपनगरात गस्त वाढविली आहे.
शुक्रवारी (ता.५) रात्री येथील माने प्लॉट एका शिक्षकांचे बंद घर फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला. चोरट्यांनी आपले चेहरे टोपी तसेच रुमालाच्या साह्याने झाकून घेतले होते. चोरटे शिक्षकाच्या दाराजवळ येऊन हत्याराने कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुचाकीवरून पोलिस घराजवळ येताच चोरटे तिथेच लपून बसण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने पोलिसांची दुचाकी पुढे गेल्यावर चोरांनी पळ काढला. चोरटे दिसताच पोलिसांची दुचाकी आल्याने चार चोरांनी पोलिसांना चाकू, कोयता आणि पारेचा धाक दाखवत पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटे चार जण आणि पोलीस दोघेजण असल्याने पोलिसांनाही काही करता आले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
—————————————————————
‘आठवड्याभरापासून चोऱ्यांची सत्र सुरू असले तरी पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने सुरू केली आहे. नागरिकांनीही घराला कुलूप लावून जाताना पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय पोलिस ॲक्शन मोडवर असून लवकरच चोरट्यांना गजाआड केले जाईल.’
-बी. एस. तळवार,
मंडळ पोलीस निरीक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे

Spread the love  पाणी योजनेसह १० तास विजेची मागणी; तीन सरकारने केले केवळ कामांचे उद्घाटनच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *