
राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक
निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत जीवन जगत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक रयत संघटना विविध मार्गाने लढा देत आहे. तरीही शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी सध्या होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संघटनेतर्फे आवाज उठविण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे भावनिक आवाहन कर्नाटक राज्य रयते संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले. येथे आयोजित कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची अद्याप अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज असून सात तास ऐवजी दहा तास थ्री फेज वीजपुरवठा करावा. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी पक्ष, जातीय भेदभाव बाजूला ठेवून संघटनेच्या कार्यात सहभाग व्हावे, असे आवाहन पोवार यांनी केले. गुरुवारी (ता.११) बेळगाव येथील विधानसभेवर शेतकरी व कार्यकर्ते धडक देणार असून त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता अक्कोळ रोड वरील पार्वती कॉर्नर येथे उपस्थित राहण्याचे आवाह करण्यात आले.
बैठकीस दत्ता लाटकर, सुनील पाटील सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, कलगोंडा कोटगे, अशोक क्षीरसागर, सागर पाटील, सुखदेव मगदूम, एकनाथ सादळकर सागर माळी, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, सागर हावले, विजय मंगावते, नामदेव साळुंखे, आनंदा गायकवाड, अर्जुन नाईक, मयूर पोवार, सिद्धाप्पा मिरजे, धोंडीबा कुंभार, आप्पासाहेब पाटील, राजेंद्र कौंदाडे, चीनु कुळवमोडे, सतीश पाटील, बाळासाहेब ऐवाळे, बाळकृष्ण शिंदे, दयानंद पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta