
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या हंचिनाळ शाखेतर्फे सैन्य दलात भरती झालेल्या जवानासह यंदाच्या हंगामात ऊसाला योग्य दर देण्यासाठी लढा देऊन प्रति टन ३४०० रुपये दर मिळवल्याबद्दलसं घटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांचा सत्कार करण्यात आला.
सिद्धगोंडा पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर सैन्य दलात भरती झाल्याबद्दल अनिकेत पाटील, अभिषेक पाटील, सार्थक नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी गुरुवारी (ता.११) थेट विधानसौधला संघटनेचे पदाधिकारी धडक देणार आहेत. दहा तास विज विजपुरवठा, पिकांची नुकसान भरपाई, जळीत ऊसाची भरपाई यासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता निपाणीतील अक्कोळ क्रॉस येथे एकत्रित येण्याचे आवाहन केले. यावेळी एम.वाय. हवालदार, दिनकर कोंडेकर, संतोष संकपाळ, सागर पाटील, काकासाहेब पाटील, कालगोंडा कोटगे, विजय गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासकाकासाहेब पंचम, सिद्धगोंडा पाटील, गजानन पोवार, आप्पासाहेब चौगुले, शिवाजी गायकवाड, संजय कानडे, जयवंत कदम, दयानंद पाटील, नामदेव साळुंखे, पिंटू मगदूम, बाळासाहेब संकपाळ, रमेश कोळी, संजय हवालदार, एस. एस. वंदुरे, मारुती मजगे यांच्यासह शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. आनंद गायकवाड यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta