



अध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी; दिवसभर पाच सत्रांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच्.जे.सी. चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे रविवारी (ता.१४) सिद्धेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर दिवंगत मुख्याध्यापक व्ही. बी. शिंदे व्यासपीठावर १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी हे असून दिवसभर पाच सत्रां मध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी दिली.
रविवार (ता.१४) सकाळी ९ वाजता ग्रंथ व विज्ञान दिंडी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एस. चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप, उपाध्यक्षा अश्विनी कांबळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता कुर्लीतील रणझुंजार आखाड्याचे शिवकालीन मर्दानी दांडपट्टा खेळाचे प्रात्यक्षिक होईल. सकाळी १०.३० वाजता संमेलन अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, डॉ. संतोष चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक. बी. चिखले यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन,
ऍड. संजय शिंत्रे यांच्या हस्ते मूर्तीपूजा होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. चौगुले हे उपस्थित राहणार आहेत.
सेवानिवृत्त सुभेदार दिगंबर माने यांच्या हस्तेविज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नानासाहेब पाटील, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष अजित पाटील, शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मिच्छिंद्र निकाडे यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता शिवाजी विद्यापीठातील युवा संशोधक डॉ. एन. एल. तरवाळ,
शिवकालीन शस्त्र संग्राहक व अभ्यासक अमरसिंह पाटील यांची मधुकर भोसले हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी
२.१५ वाजता इस्लामपूर अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे भास्कर सदाकाळे यांचा
अंधश्रध्दा निमूर्लन प्रायोगिक कार्यक्रम, दुपारी ३.३० वाजता भोज मधील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक डी. एस. शेवाळे आणि पांगीरे (बी) येथील शिक्षक एस. एम. नदाफ यांचा विज्ञान प्रायोगिक कार्यक्रम होणार आहे.तरी पाणी आणि परिसरातील विज्ञान प्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक चौगुले यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta