


निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव येथील विधानसभेवर कर्नाटक राज्य रयत संघटनेने शेतकऱ्यासमवेत कर्नाटक राज्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. तेथील ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, साखरमंत्री शिवानंद पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह विविध खात्याच्या मंत्र्यासमवेत राजू पोवार, राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची सुमारे तासभर बैठक झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, कृषी पंपांना दहा तास थ्री फेज वीजपुरवठा, महापूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई, शेतीमालाला हमीभाव, वृद्ध शेतकऱ्यांना वेतन, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह विविध मागण्यांसाठी लवकरच पुन्हा संघटनेची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यंदाच्या हंगामातील उसाला सरकारने चांगला दर दिल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. चार दिवसात भेटत घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला.
यावेळी अशोक क्षीरसागर, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब ऐवाळे, कालगोंडा कोटगे, एकनाथ सादळकर, सुखदेव मगदूम, बाबासाहेब पाटील, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, अनिल गायकवाड, नामदेव साळुंखे, मयूर पोवार, आनंदा गायकवाड, श्रीधर पाटील, प्रकाश पोवार, सिध्दगोंडा पाटील, विजय गुरव यांच्यासह निपाणी तालुक्यातील संघटनेच्या शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta