
साखरमंत्री शिवानंद पाटील; राजेंद्र वडर यांनी मांडल्या समस्या
निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर बोरगावमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. पण शासनाच्या दुर्लक्षामुळे पार्कमधील उद्योग वर्षभरापासून बंद आहेत. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क व कर्नाटक राज्यातील कापड व्यवसायाकडे लक्ष देण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी साखरमंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे केली. त्याला प्रतिसाद मिळून पाटील यांनी वस्त्रोद्योगाला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव येथे वडर यांनी भेट घेतली असता पाटील यांनी वरील आश्वासन दिले.
महाराष्ट्रात कापड निर्मितीला सरकारकडून देण्यात येणारा निधी कर्नाटक सरकारकडूनही दिल्यास वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना मिळेल. त्यासाठी कर्नाटक सरकारने याकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्रात वस्त्रोद्योगासाठी सरकारकडून पाच रुपये प्रति युनिट प्रमाणे विज दर आकारणी होते. पण कर्नाटकात अवघ्या पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या बोरगाव वस्त्रोद्योग पार्क मधील व्यवसायिकांना तब्बल अकरा रुपये प्रति युनिट प्रमाणे विज दर आकारला जात आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग कारखानदारांना व्यवसाय सुरू करणे कठीण झाले आहे. याशिवाय व्यवसायात घातलेला निधीदेखील परत मिळत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार अथवा व्यवसायासाठी गुंतवलेला निधी निघत नसल्यामुळे कारखाने बंद स्थितीत आहेत. वस्त्रोद्योग व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे पाच रुपये प्रति युनिट प्रमाणे विद्युत पुरवठा करून कापड व्यवसायाला चालना द्यावी.
पाच रुपये प्रमाणे प्रति युनिट विद्युत पुरवठा करून उर्वरित सहा रुपये सरकारकडून भरावे. शिवाय आतापर्यंत मागासवर्गीय जाती-जमातीसाठी शासनाकडून ९० टक्के सवलत उद्योग व्यवसायासाठी दिली जात होती. पण सध्या फक्त दोन कोटी रुपयासाठी सरकारकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय जाती-जमातीतील नागरिकांना उद्योगधंदे उभा करणे जीकेरीचे बनले आहे. त्यासाठी पूर्वी असलेल्या सवलतीप्रमाणे कर्ज उपलब्ध करून कर्नाटक सरकारने मागासवर्गीय जाती जमातीतील तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी केली. शिवाय वस्त्रोद्योग व साखर मंत्री शिवराज पाटील यांनी बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्कला भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी केली. यावर शिवराज पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये सदर विषयांवर चर्चा करण्यात आली असून त्यावर ठराव संमत करण्यात आले आहे. आता लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनुसार बोरगाव पार्कसह कर्नाटकात असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येणार आहेत विद्युत दरामध्ये कमी करून वस्त्रोद्योग व्यवसायाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta