
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलची शैक्षणिक सहल दक्षिण कर्नाटकात विविध ठिकाणी ७ दिवस काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणचा अविस्मरणीय क्षण अनुभवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही सहल यशस्वी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सलग सात दिवसानंतर ही सहल सुखरूपरीच्या आदर्श पद्धतीने निपाणीत पोहोचली.
सहलीमध्ये आठवी ते दहावीचे एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर, के. एल. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ शिक्षक सहलीत सहभागी झाले होते.
सहलीत हाळेबीडू व बेलूर येथील ऐतिहासिक लेणी व मंदिर, म्हैसूर येथील चामुंडी हिल, बोटॅनिकल गार्डन, राजवाडा वृंदावन गार्डनची पाहणी करून त्याचा अभ्यास केला. मडिकेरी (कुर्ग) मधील निसर्ग व संस्कृती, तिबेटियन कॉलनीतील बुद्धांचे गोल्डन टेम्पल, झुलता पूल, बेटांची बाग ही निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यात आली. याशिवाय धबधबे, नद्या व धार्मिक स्थळे, उडपी येथील श्रीकृष्ण मंदिर, संत कनकदास व श्रीकृष्ण यांचे नातेबंध याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. रात्रीचा मुक्काम मुर्डेश्वर येथे करण्यात आला. मुर्डेश्वरसह विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आल्या.
Belgaum Varta Belgaum Varta