
जर्मनीतील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या परिषदेत सहभाग ; राहुल गांधींसोबत केली विशेष चर्चा
निपाणी (वार्ता) : जागतिक पातळीवर काम करत असलेल्या युथ काँग्रेसचे संचालक आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे जर्मनी देशातील समन्वयक साईस्वरूप लक्ष्मण चिंगळे यांनी बुधवारी (ता.१७) जर्मनी देशातील बर्लिन येथे पार पडलेल्या परिषदेत सहभाग घेऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी विशेष चर्चा केली. निपाणीतील युवकाने जागतिक पातळीवर घेतलेली ही कामगिरी निपाणी तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
साईस्वरूप लक्ष्मणराव चिंगळे हे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी स्वकर्तृत्ववाने ही कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईस्वरूप हे जर्मनीतील एका खाजगी कंपनीत कार्यरत असून गलेलठ्ठ पगाराची नोकरी असतानाही ते जागतिक पातळीवर काँग्रेसची विचारधारा पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. १५ ते २० डिसेंब रदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जर्मनी दौऱ्यावर आहेत. बुधवारी (ता.१७) रोजी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने बर्लिन येथे आयोजित केलेल्या विशेष परिषदेत गांधी यांनी सहभाग घेतला. यावेळी अनिवासी भारतीयांच्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायोजना यावर त्यांनी चर्चा झाली.
याबाबत बोलताना साईस्वरूप चिंगळे यांनी, जर्मनी येथील भारतीय आणि काँग्रेसची विचारधारा याबद्दल आणखी मजबूत नाते राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे झाल्याचे सांगितले. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्ष सॅम पित्रोदा, आयओसीचे युरोपियन समूहाचे प्रमुख प्रमोदकुमार यांच्यासह इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे युरोपातील प्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta