

सहकाररत्न उत्तम पाटील; अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना शिलाई मशीन वाटप
निपाणी (वार्ता) : महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यांची शहर आणि गाव पातळीवर अंमलबजावणी केली जात आहे. त्यास पार्श्वभूमीवर येथील अनुसूचित जाती जमाती मधील महिलांना शिलाई मशीन चे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या उद्योग व्यवसायाला हातभार लागणार आहे. महिलांच्या हाताला काम मिळून उत्पन्नात वाढ होऊन स्वतःचे कुटुंब आर्थिक स्वावलंबी बनणार आहे, असे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथे गुरुवारी (ता.१८) अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील ६० महिलांना घरबसल्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपंचायती तर्फे शिलाई मशीनचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उत्तम पाटील बोलत होते.
अनुसूचित जाती जमाती मधील महिलांना शिलाई मशीन वाटप करून त्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल महिलांतर्फे उत्तम पाटील व नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगरपंचायत नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी, अभय कुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, दिगंबर कांबळे, नगरसेविका शोभा हवले, वर्षा मनगुत्ते, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, अमर शिंगे, रमेश कुरळे, सुकुमार हिरेमनी यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta