

अरिहंत सूतगिरणीस रोहिणी सिंधुरी यांची भेट
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण सहकारी तत्त्वावर अरिहंत
सूतगिरणीची निर्मिती केली. पण हा व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला आहे. वाढते वीज बिल, जागतिक बाजारपेठेत सुताला योग भाव न मिळणे व अनेक अडचणींमुळे या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड बनले आहे. महाराष्ट्राप्रमाणे आपल्यालाही वीज
बिलात सवलत मिळावी. त्या ठिकाणी असलेले धोरण या ठिकाणी अमलात- आणावे व वस्त्रोद्योग व्यवसायाला – पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, – अशी मागणी वस्त्रोद्योग खात्याच्या मुख्य सचिव रोहिणी सिंधुरी यांच्याकडे अरिहंत सूतगिरणीचे चेअरमन उत्तम पाटील यांनी केली.
उद्योजक अभिनंदन पाटील म्हणाले, संपूर्ण कर्नाटक राज्यात सहकार तत्वावर चालणारी ही एकमेव सूतगिरणी आहे. या ठिकाणी सरकारकडून पार्कही उभा करण्यात आले आहे.पण येथे सोई सुविधा नसल्याने उद्योजक या ठिकाणी व्यवसाय उभारण्यास पुढे येत नाहीत. वस्त्रोद्योग व्यवसाय वाढल्यास परिसरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बाजारपेठात मंदी असून वाढीव वीज दरामुळे सर्वांनाच मोठी अडचण बनली आहे. तरी शासनाने याबाबत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
याप्रसंगी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या, सीमाभागातील व जवळच्या महाराष्ट्र राज्याच्या मँचेस्टर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व्यवसाय बाबत संपूर्ण माहिती घेतली. कर्नाटक राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायासाठी विविध योजना हाती घेतल्या असून आपल्या मागणीबाबत लवकरच आपण वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडू.
यावेळी वस्त्रोद्योग खात्याचे वरिष्ठ संचालक सी. एस. योगीश, सहसंचालक डॉ. शिवराज कुलकर्णी, उपसंचालक जयचंद्र पाटील, अधिकारी सिद्ध कुंभार, कारखान्याचे कार्यकारी संचालक युवराज ज्योती, सीईओ राजेश कार्वेकर, टेक्निकल मॅनेजर संदीप कुलकर्णी, अशोक बंकापुरे, आर. टी. चौगुला, रोहित पाटील उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta