

राजेंद्र वडर पवार यांची आमदार प्रकाश हुक्केरी यांच्याकडे मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक शाळांची इमारती मोडकळीस आल्या असून शाळेवरील कौले मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. त्यामुळे शाळेला येत असलेला निधी मुख्याध्यापकांच्या कडून खर्च करण्यात येत आहे. त्यासाठी निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील सरकारी शाळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विधान परिषद सदस्य व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्याकडे भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी केली. तश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठी निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन प्रकाश हुक्केरी यांनी दिले.
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर -पवार यांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार व दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्याकडे निपाणी तालुक्यातील सरकारी शाळांची दयनी अवस्थेबद्दल माहिती सांगितली. निपाणी मतदारसंघात नदी कडेला असणाऱ्या गावांमध्ये असलेल्या सरकारी शाळांची अवस्था मोठ्या प्रमाणात बिघडलेले आहे. अनेक शाळेमध्ये पुराचे पाणी येत असल्यामुळे त्या शाळांच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत. गेल्या ३०-४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणे धोक्याचे बनले असून अशा शाळेमध्ये मुलांना पाठविणे पालकांच्यातून नाकारले जात आहे. उन्हाळ्यामध्ये सरकारी शाळेवर असलेली कवले माकडांच्या मुळे मोठ्या प्रमाणात फुटत आहेत. यामुळे देखील पावसाळ्यात शाळेच्या मध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असते. आधीच दयनीय अवस्थेत असणाऱ्या सरकारी शाळांची स्थिती यामुळे आणखीन बिकट बनत आहे. अनेक शाळेमध्ये धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी जागा उपलब्ध नसते. चिकोडी तालुक्यातील शाळांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून अशा शाळांचा विकास होणे अत्यंत गरजेचा आहे. त्यासाठी शिक्षक मतदार संघातील आमदार प्रकाश हुक्केरी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा. व सरकारी शाळांचा उद्धार करावा. अशी मागणी राजेंद्र वडर -पवार यांनी केली. यावर प्रकाश हुक्केरी यांनी शिक्षण मंत्र्यांना याबाबत सविस्तर माहिती सांगून येत्या काळात सरकारी शाळांचा विकास करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले. शिवाय यावेळी उपस्थित शिक्षणाधिकाऱ्यांना ज्या ज्या गावांमध्ये सरकारी शाळांचा अस्तित्व धोक्यात आला आहे. अशा शाळांचा माहिती गोळा करून ताबडतोब आपणाला द्यावे, अशी मागणी केली. शिवाय ज्या शाळेच्या इमारती मोडकळीच आल्या आहेत. त्या शाळेच्या विकासासाठी लागणारा निधी किती? याबाबत सविस्तर माहिती पाठवावे. त्यावर आपण ताबडतोब निधी मंजूर करू असे सांगितले. शिवाय राजेंद्र वडर -पवार यांना शाळांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्न करावे. आपल्या भागातील शाळांची अवस्था यावर आपण माहिती पुरवावी अशी सूचनाही प्रकाश हुक्केरी यांनी केली. यामुळे सरकारी शाळेतील शिक्षक, पालक यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



Belgaum Varta Belgaum Varta