

उपाध्यक्षपदी ऐनापुरे : संस्थेच्या पदाधिकारी निवडी जाहीर
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका डाॅक्टर्स असोसिएशन संलग्नित एएफआय कर्नाटक या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रमोद निळेकर,निपाणी तर उपाध्यक्षपदी डॉ. गजानन ऐनापुरे, निपाणी, सेक्रेटरीपदी डॉ. सचिन हजारे, शिरगुपी तर खजिनदारपदी डॉ. आयुब परकुटे, खडकलाट यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची पदाधिकारी निवडीबाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या.
प्रारंभी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. प्रमोद निळेकर म्हणाले, असोसिएशनच्या माध्यमातून या पुढील काळात सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळे शिबिरे भरविले जातील यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सदस्यपदी डॉ. काकासाहेब गुरव, पट्टणकुडी, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, अकोळ, डॉ. दौलत जाधव, कोगनोळी, डॉ. राजेंद्र कुंभार, कुन्नुर, डॉ. माधव कुलकर्णी, निपाणी यांची निवड करण्यात आली. बैठकीस डॉ. महेश ऐनापुरे, डॉ. विनय नागराळे, डॉ. शिवा दुमाले, डॉ. संदिप चिखले, डॉ. अर्जुन जनवाडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.



Belgaum Varta Belgaum Varta