
निपाणी (वार्ता) : मराठा समाजाला मिळणाऱ्या कर्नाटक सरकारच्या सोयी सुविधा, आरक्षण व इतर विषयावर निपाणी तालुक्यातील मराठा समाजातील प्रमुख व्यक्तींचा चिंतन मेळावा शनिवारी (ता.२७) रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात होणार आहे. त्यामध्ये विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्या बाबत सोमवारी (ता.२२) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये २७ रोजी चिंतन मेळावा होणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शनिवारी सायंकाळी ४ वाजता निपाणी तालुक्यातील मराठा समाजाच्या चिंतन मेळाव्यात मराठा समाजाचे आमदार, कर्नाटक राज्याचे कामागार मंत्री व मराठा समाजाचे मार्गदर्शक संतोष लाड, माजी मंत्री श्रीमंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यात मराठा समाजासाठी कर्नाटक शासनाकडुन मिळना-या सुविधा, राजकीय आरक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन, आनिष्ठ चालिरिती, समाजाच्या शैक्षणीक, अर्थीक,सामाजीक प्रगतीसाठी त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय समाजातील कार्यकर्ते व नागरिकांच्या अडीअडचणी याबद्दलही सविस्तर चर्चा होणार आहे. तरी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात शनिवारी (ता.२७) दुपारी ४ वाजता होणाऱ्या मेळाव्यास मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे अवाहन निपाणी तालुका मराठा समाजाच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta