
संचालक प्रवीण बागेवाडी यांची माहिती; ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालयात शुक्रवारी (ता.२६) सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळावा आणि ऋणानुबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आशीर्वाद मंगल कार्यालयात निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रवीण उर्फ अमर बागेवाडी यांनी दिली. सोमवारी (ता.२२) महाविद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते
प्रवीण बागेवाडी म्हणाले, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. शिवाय समाजाचे मार्गदर्शक बनले आहेत. अशा यशस्वी विद्यार्थ्यांसोबत जिव्हाळ्याच्या क्षणांना उजाळा देण्याच्या संकल्पनेखाली हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून होत आहे. यावेळी वर्गमित्रांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधून आठवणींना उजाळा मिळेल अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयाला आधुनिक शैक्षणिक केंद्र बनवण्यासाठी हाती घेतलेल्या नूतनीकरणाच्या कामांवरही चर्चा होईल. या प्रसंगी, माजी विद्यार्थ्यांच्या सूचना संस्थेच्या शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे बागेवाडी यांनी सांगितले.
निवृत्त प्राचार्य एम. बी. कोथळे यांनी, संस्थेचे संचालक प्रवीण उर्फ अमर बागेवाडी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे हुबळी येथील के एल ई. पी. सी. जॉबिन सायन्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. बी. हिरेमठ, कोल्हापूर येथील बीएसएनएल मधील निवृत्त उपमहाव्यवस्थापक लिंगराज गोधी उपस्थित राहतील. यावेळी स्थानिक मंडळाचे अध्यक्ष एम. व्ही. बागेवाडी, सदस्य डॉ. एस. आर. पाटील, उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी, माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी होणार असल्याचे सांगितले.
बैठकीस निवृत्त प्राध्यापक डॉ. एस. बी. सोलाबन्नावर, पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या हेमा चिक्कमठ, संचालक रवींद्र शेट्टी, मल्लिकार्जुन गडकरी, माजी विद्यार्थी संघटनेच्या सचिव प्रा. प्रियांका कमते, मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. श्रीपती रायमाने, कन्नड विभाग प्रमुख डॉ. बसवराज जनगौडा, समन्वयक अतुलकुमार कांबळे, आर. जे. खराबे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta