
निपाणी(वार्ता) : निपाणी येथील मावळा ग्रुप संचलित पाचवी गडकोट मोहीमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी मोहिमेसाठी ३०० पेक्षा अधिक मावळ्यांनी नोंदणी केल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली.
मावळा ग्रुपच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रुपचे सल्लागार उदय शिंदे म्हणाले, यंदा ही मोहीम किल्ले अजिंक्यतारा व किल्ले तोरणा येथे जाणार आहे. वीरूपाक्षिलिंग समाधी मठातील प्राणलिंग महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम होणार आहे. शनिवारी (ता.२७) रोजी पहाटे येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत या मोहिमेस प्रारंभ होणार आहे. २७ रोजी किल्ले अजिंक्यतारास भेट दिल्यानंतर सायंकाळी इतिहास अभ्यासक सचिन खोपडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी किल्ले तोरणा गडास भेट दिल्यानंतर सायंकाळी सर्व मावळे निपाणीस परतणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष राहुल सडोलकर – भाटले, खजिनदार सुशांत कांबळे, मुख्य समन्वयक दादा जनवाडे, सेक्रेटरी अनिल चौगुले, सल्लागार संजय चिकोडे, उत्सव समिती अध्यक्ष महादेव बन्ने, उपाध्यक्ष विजयकुमार बुरुड, कार्याध्यक्ष हेमंत चव्हाण, नवनाथ खवरे, संचालक राहुल पाटील, शांतीनाथ मुदकुडे, अमृत ढोले, विनायक खवरे, दयानंद साजन्नावर, पुंडलिक निकम, सागर खांबे, पृथ्वीराज घोरपडे, स्वराज मोहिते यांच्यासह मावळा ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta